• csmsvbs@gmail.com
  • शास्त्री नगर, कोथरूड, पुणे, महाराष्ट्र - 411038

संस्थेविषयी माहिती..

आमच्या सेवा..

समाजकार्यातून
राष्ट्रप्रगती

छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य, पराक्रम, रयतेविषयी असलेली आस्था, दूरदृष्टी आणि विचार या महान गुणांमधून प्रेरणा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक व बहुउद्देशीय संस्थेची स्थापना २०१६ मध्ये करण्यात आली. समाजातील सर्व घटकांना दर्जेदार शिक्षण, उत्तम आरोग्यसेवा, सुरक्षित व पुरेसा निवारा तसेच नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, हा संस्थेचा मुख्य उद्देश आहे. भारत देश प्रत्येक क्षेत्रात आत्मनिर्भर व्हावा, या उदात्त ध्येयाने संस्था सातत्याने कार्यरत आहे. “समाजकार्यातून राष्ट्रप्रगती” या ब्रीदवाक्याला अनुसरून, भारताचे भविष्य असलेल्या बालकांच्या बौद्धिक व शारीरिक विकासासाठी विविध गुणवत्तापूर्ण कार्यक्रम राबविले जातात. संस्थेच्या कार्याचा लाभ जास्तीत जास्त गरजूंपर्यंत पोहोचावा, या व्यापक ध्येयाने संस्था कार्य करत आहे.
संस्थेची कार्यकारिणी

समाजाच्या सेवेसाठी झटणारी आमची टीम