शैक्षणिक उपक्रम
शैक्षणिक साहित्य वाटप :
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप करण्यात येते. यामध्ये वह्या, दप्तर, कंपास इत्यादींचा समावेश असतो.
पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप :
कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूरवाडी येथे पुरामुळे नुकसान झालेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
क्रीडा व शैक्षणिक साहित्य वाटप :
ग्रामिण भागातून शहरात शिक्षणासाठी आलेल्या विद्यार्थांना क्रीडा व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
पुण्यातील ‘विद्यार्थी साहाय्यक समिती’च्या विद्यार्थांना‘मिराकी इव्हेंट्स’व संस्थेच्या माध्यमातून
प्रसिध्द बांधकाम व्यवसायिक प्रवीण बढेकर यांच्या हास्ते क्रीडा व शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
उन्हाळी शिबिर :
उन्हाळी सुट्टीमध्ये विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा आणि त्यांच्या ज्ञानात भर पडावी या उद्देशाने तीन दिवसीय उन्हाळी शिबिराचे आयोजन विविध शैक्षणिक संस्थेत करण्यात येते. यामध्ये चित्र रेखाटन, ढोल वादन, कराटे प्रशिक्षण, बालसंस्कारकथा, हास्यजत्रा आदी उपक्रम राबविण्यात येतात.
कला साहित्य वाटप :
‘दि पूना स्कूल अँड होम फॉर द ब्लाइंड गर्ल्स’ या शाळेतील विशेष मुलींना कला व नाटक सादरीकरणासाठी जिरेटोप, ढाल, तलवार, चिलखत, मावळा पोशाख व पुणेरी पगडी आदी साहित्याचे वाटप बढेकर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण बढेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
