पर्यावरण, स्वच्छता व आपत्ती व्यवस्थापन उपक्रम
वृक्षारोपण :
विविध शाळा, महाविद्यालय, विद्यालयातील विद्यार्थी व शिक्षकांना सोबत घेऊन वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात येतो. तसेच लावलेल्या वृक्षांचे जतन व्हावे या उद्देशाने विद्यार्थी व गावकरी पालकत्व स्वीकारून त्याची जबाबदारी घेतात.
स्वच्छता :
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील मालवंडी गावाचे ग्रामदैवत श्री शेकागौरी यात्रेचे आयोजन संपन्न झाल्यानंतर गावकऱ्याना सोबत घेऊन गावातील सर्व प्रमुख रस्त्यांची स्वच्छता करण्यात येते. पुणे शहरातील मुठा नदीकाठ परिसर स्वच्छ करण्यात आला .
आपत्ती व्यवस्थापन :
कोल्हापूर येथे २०१९ मध्ये आलेल्या महापुराच्या वेळी राजापूरवाडी या गावात जाऊन तेथील शाळेची स्वच्छता करण्यात आली.
