रक्तदान शिबिर: गरजू रुग्णांना वेळेत व कमी खर्चात रक्त मिळावे या उद्देशाने दरवर्षी शिवजयंती निमित्त विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते.
डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर: ज्येष्ठ नागरिकांना डोळ्यांनी कमी दिसणे, डोळ्यांतून पाणी येणे अशा समस्या जाणवतात. या समस्या दूर करण्यासाठी मोफत डोळे तपासणी व चष्मे वाटप उपक्रम राबविण्यात येतो. मोतीबिंदू असल्यास रुग्णांना पुण्यातील एच. व्ही. देसाई रुग्णालयात आणून त्यांच्यावर मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येते. एक रुपयाही शुल्क न घेता हा उपक्रम राबविण्यात येतो. आजपर्यंत जवळपास शेकडो मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत, तर सत्तरपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांना मोफत चष्म्यांचे वाटप करण्यात आले आहे.
